तू बिग बझार चे ब्रान्डेड शो रूम
आपण साधा वाण्याचा दुकान पण नाय !
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू पाकात बुडालेला रसगुल्ला
आपण लोणावळाची चिक्की पण नाय !
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू 500 GB ची Hard-Disc
आपण 1 GB चा पेन ड्राईव्ह पण नाय !
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू गुगल iphone
आपण साधा Landline पण नाय !
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू "Chevrolet Cruze" कार
आपण तर तीन चाकी सायकल पण नाय
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू जगजीत सिंग ची गझल
आपण अण्णू मलिक ची बकवास शायरी पण नाय !!
आपली तर काय लायकीच नाय !!!...
तू लेखणीतून निघणारा एक-एक शब्द
आपण तर लेखणीची शाई पण नाय !
आपली तर काय लायकीच नाय !!!...
- संदीप.

No comments:
Post a Comment