Thursday, 6 September 2012

ट्रिंग ट्रिंग !!!!



ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"

१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला 
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..

चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील 
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला 
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...

काही वर्षांनी,

आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा 
इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा...
त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां
८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा... 

STD कॉल लावण्यासाठी होती "Trunk Call System"
१८७ नंबर वर असलेली बाई सांगायची "You are in waiting"...



क्रॉस कनेक्शन्स ची तर असायची भलतीच धमाल-मस्ती
मित्राकडे फोन लावला तर ऐकू यायची २ मारवाडींची शाब्दीक कुस्ती...


काही वर्षांनी,

घरोघरी Wireless आणि Caller-ID वाले फोन आले 
मैत्रिणींच्या घरी फोन करायचे वांधे सुरु झाले...
मध्यंतरी PAGER नी Replace केला Wireless ना
पण Pagers बंद नाही पाडू शकले Landline चा जमाना... 

२१ व्या शतकातले पर्व म्हणजे Mobile, I-phone आणि Broadband Internet
सर्वांच्याच हातात दिसतात किमान २ Handset …
पण आजही जेव्हा घरोघरी दिसतो ट्रिंग ट्रिंग वाला "डब्बा"
वाटते कोणताच I-Phone घेऊ शकणार नाही Landline ची जागा..!!!

- संदीप.

!!! हाफ कटींग !!! .....



!!! हाफ कटींग !!! .....


बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..


कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk'
Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk'

बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..


ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम
बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम..



बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..


पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची
आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची

बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..


Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिकारी
वा , व्यवसायात मिळवू यश आकाशापरी..


आम्ही सोडणार नाही ती टपरी आणि तो हाफ कटींग
जीवनात अनमोल स्थान असलेली आहे ती "Very Important Thing"..!!


चलो इसी बात पे हो जाये एक........................ !!!! "हाफ कटींग" !!!!


-संदीप.

!!! आई मी आता मोठा झालोय !!!





!!! आई मी आता मोठा झालोय !!!
(एका इयत्ता पाचवी मधल्या मुलाची व्यथा )

आई , आई मी आता झालोय मोठा
का समजतेस तू अजूनही मला छोटा..

मला पण हवी शाळेत जायला दादाची बाईक 
शाळेत सोडायला येऊ नको मला , एकदातरी ऐक..

इंटरनेट वर बसून काढायचंय फेसबुक वर 'Account'
आणि पॉकेटमनीची सुद्धा वाढवुन हवी मला 'Amount'..

मित्रांसोबत बघायचीय मला 'Katrina' ची मुव्ही 
ऐकूदे ना मलाही ते गाणे, "कैसे मुन्नी बदनाम हुई"

"Local Train" ने एकदा तरी प्रवास करू दे ना छोटा
अगं आई मी आता खरंच झालोय गं मोठा..

भातुकलीची खेळणी नको , हवा मला 'PS - 2 ' खेळायला
आणि घेऊन दे १ मोबाइल फोन , "Off Lecture" ला वेळ जायला

हे सगळे हवे मला आत्ताच्या आत्ता........

कारण आई मी खरंच झालोय आता मोठा
अगदी खंररररररचं झालोय मोठा...!!!!

- संदीप.

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!




भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा

Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा..



चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा
Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा..

Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची
Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची..

Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King'
सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " ..

या गदारोळात Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते
'आम्ही पण 
आहोत सभेत' , एवढंच तर ते सांगत होते..

सभेचा गोंधळ पाहून 'Parliament' ला देखील वाटली लाज
नको ते Facebook आणि Orkut, वाटतेय 'DELETE' करावे सर्व Accounts आज !!!


- संदीप.