पहिली भेट...
आठवते मला ती पहिली भेट,
हास्य तिचे भिडले काळजाला जाऊनि थेट
ठिकाण Platform No. ५, स्टेशन-डोंबिवली,
लोकलची गर्दी पाहून झाली जीवाची काहिली
इतक्यात समोर आली ती तेजस्वी नजर,
काळजात माझ्या एकच झाला गजर
काया पाहुनी तिची, असा काही झाला असर,
लोकलच्या गर्दीचा पूर्णता: पडला विसर
हळुवार होती तिची चाल अन ड्रेसचा लूक होता अनोखा,
उभी राहिली ती माझ्या शेजारी, तोच चुकला माझ्या काळजाचा ठेका
एकच प्रश्न केला तिने मला,
"Excuse me! वाजले किती?"
कसे सांगू मी तिला,
तिच्या उपस्थितीने ती वेळच थांबली होती
घाबरत घाबरत मी उत्तर दिले,
"Its Half Passed 9"
स्मित हास्य देत ती म्हणाली
"Ok Fine.."
काही क्षण मला होतच नव्हता विश्वास,
कारण तो क्षणच होता माझ्यासाठी खास
इतक्यात ९.३२ ट्रेन Platform वर आली,
आणि अचानक ती गर्दीत दिसेनाशी झाली
माझी नजर सर्वत्र तिला शोधत होती,
पाहिले अवती-भोवती, कुठेच दिसली नाही ती
या सर्व गडबडीत माझी ट्रेन चुकली,
आणि तिची शेवटची झलक बघण्याची संधीही मुकली
मी खूपच भांबावलो......वैतागलो,
आणि पुन्हा ट्रेनची वाट बघू लागलो
पुढची ट्रेन पकडून मी दादरला पोहोचलो,
तिची झलक पुन्हा न मिळाल्याने थोडासा खचलो
Taxi ड्रायवरला विचारले, "सिद्धी-विनायकला चलणार का?"
इतक्यात कोणीतरी विचारले, "सिद्धी-विनायकसाठी शेअर Taxi करणार का?"
मी मागे वळून पाहतो आर "तीच" होती,
वाढली अचानक माझ्या हृदयाची गती
आम्ही दोघेही Taxi मध्ये जाऊन बसलो,
आणि जे काय घडतंय ते पाहून मी मनातच हसलो
निघालो आम्ही दोघेही 'सिद्धी-विनायक दर्शनाला,
तिला पाहण्याची इच्छा पूर्ण झाली, म्हणजे ... नक्कीच आज सिद्धी-विनायक पावला !!!!
- संदीप

No comments:
Post a Comment